औरंगाबादच्या प्रसिद्ध बिग स्टार तायक्वांदो अकादमीच्या पाच खेळाडूंनी दक्षिण कोरियाच्या कुक्कीवॉन जागतिक तायक्वांदो मुख्यालयातून ब्लॅक बेल्ट डॅन-1 पदवी प्राप्त केली आहे.
अश्लेषा मोरे, आदित्य मोरे, नितीन सोजे, हुजेफ अत्तर आणि नम्रता वाटोडे अशी या खेळाडूंची नावे आहेत.
दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर, सतत प्रशिक्षण आणि समर्पणाने त्यांनी हा टप्पा गाठला आहे.
हे तायक्वांदो खेळाडू भारतातील प्रसिद्ध तायक्वांदो मास्टर चॉनी बसनेट आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संतोष बसनेट यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहेत.
या यशाबद्दल बिग स्टार तायक्वांदो अकादमीच्या अध्यक्षा लक्ष्मी बसनेट आणि कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ व नरेश क्षत्रीय यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांचा गौरव केला.
Comments